गंगापूर नगरपालिकेच्या प्रभाग क्रमांक ४ (ब), ६ (ब) प्रभागात आज मतदानाला सुरुवात

Foto
उद्या मतमोजणी होणार आहे 

गंगापूर, (प्रतिनिधी): नगरपालिकेतील प्रभाग क्रमांक ४ (ब) व ६ (ब) या दोन जागांसाठी आज सकाळी आठ वाजेपासून मतदान प्रक्रिया सुरू झाली आहे. न्यायालयीन प्रक्रियेमुळे रखडलेल्या या निवडणुकीस आज अखेर प्रारंभ झाला असून, मतदारांमध्ये उत्साहाचे वातावरण पाहायला मिळत आहे. सकाळी आठ वाजल्यापासून मतदान  ६२  केंद्रांवर मतदारांनी रांगा लावण्यास सुरुवात केली.

पहिल्या दोन तासांत एकूण ४.०६ टक्के मतदान झाले असल्याची अधिकृत माहिती मिळाली आहे. दरम्यान, कोणता उमेदवार विजयी होणार आणि कोणाचा पराभव होणार, यावर शहरात चर्चा व पैजा रंगल्या आहेत. प्रभाग क्रमांक ६ (ब) मध्ये माजी नगरसेवक नेता नईम मन्सुरी आणि समाजसेवक व कार्यकर्ता सय्यद अख्तर यांच्यात चुरशीची लढत होत आहे. तर प्रभाग क्रमांक ४ (ब) मधील लढतीकडेही नागरिकांचे लक्ष लागले आहे. 

आज मतदान प्रक्रिया पार पडत असून, २१ डिसेंबर रोजी मतमोजणी होणार आहे. या निकालाकडे संपूर्ण गंगापूर शहराचे लक्ष लागले असून, निवडणूक निकालातून नगरपालिकेच्या राजकारणाची पुढील दिशा स्पष्ट होणार आहे.